Jul 12, 2014

Happy Monsoon

Here is my first post on the blog. Hope "readers" like it. :).

- Gauri.


तो येणार तो येणार … त्याच्या येण्यावर अनेकांच्या आशा एकवटलेल्या असतात. कुणाला तो सखा म्हणून हवा असतो तर कुणाला सोबति. कुणाचे त्याच्यावर जगणे अवलंबून असते म्हणून हवा असतो तर कुणाला आपल्या प्रियकराबरोबर त्याच्या समवेत आनंद लुटायचा असतो.

अशातच एका संध्याकाळी तो येतो अगदी शांत पणे. मृग नक्षत्रात येतो ना  आशा लावणारा अगदी तसा . धरती त्याच्या फक्त दर्शनानेच पुलकित  होते. दुरावा झाल्यावर प्रेयसी ला प्रियकर लांबून दिसल्यावर ती जशी सुखावते ना अगदी तशिच. झाडे सुधा त्याचा येण्याने सुखावतात. मिळालेल्या सुखात नेहमी भिजून घ्यावे अगदी चिंब तशी ती हि भिजून घेतात. पशुपक्षी आनंदाने गीत गाउ लागतात. 


तो मात्र सगळयांचे निरीक्षण करत असतो  अगदी न सांगता , न बोलता... शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील आशा, केस मोकळे सोडून भिजणाऱ्या मुलीं मधला मोकळेपणा , धरती मधला उल्हसित पणा, घरात बसून ओल्या मातीचा सुगंध घेत वाफ़ळ्ता चहा घेत त्याला खिडकीतून च पाहण्यात समाधानी असणार्‍या स्त्री चा आनंद तर "aaj मौसम ही बडा " असे गाणे म्हणत मुक्त पणे पावसात भिजत असणाऱ्या प्रेमी युगुलाचा आनंद, साचलेल्या पाण्यात नावा करून सोडून देणाऱ्या लहान मुलांचा खट्याळ पणाआणि गॅलरी मधून पावसाला बघत जुन्या कालच्या गोष्टीना उजाळा देत आठवणीत हरवलेले आजी आजोबा, अगदी हवा हवासा वाटणारा तरीही झोपडी मध्ये पाणी गळत असल्याने थोडेसे दुखी  असलेल्या स्त्री ची अगतिकता, पाणी पिउन शांत झालेल्या चातकाची तृप्तता अगदी  क्षण भंगुर आनंद देणारा तो पण त्याला  स्वतःचे खूप कौतुक वाटते.

थोड्याच वेळात काळे ढग संपून आकाश निरभ्र होते. तो निघतो उद्या परत येण्यासाठी जगाला एक नवीन आशा दाखवण्यासाठी , सृष्टीच्या सृजना साठी, नवीन ऋतू निर्मितीसाठी संपूर्ण प्राणीमात्रांवर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आणि नेमेचि येतो मग पावसाळा हि उक्ती सार्थ करण्यासाठी  :)

हैप्पी मान्सून. 

1 comment:

Prashant Marathe said...

खूपच छान लिहिता तुम्ही वहिनी...
केवळ अप्रतिम.. Keep it up..
.. :)