Jul 22, 2014

नायगारा आणि आम्ही


माझ्या आयुष्यातील एक सुंदर संध्याकाळ …. मी आणि रंजन नायगारा धबधबा पाहायला गेलो होतो. रंजन कडून मला मिळालेली हि अविस्मरणीय अशी भेट आहे. एक  भौगोलिक आश्चर्य आणि विज्ञाना च्या सहायाने त्यावर मत करीत निसर्गाला  पूर्णपणे काबूत आणता येत नसले तरी त्याचा उपयोग करून त्याच्या पासून बचाव करून स्वताचा फायदा करून घेणारा आजचा प्रगत माणूस ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समोर होत्या.

संध्याकाळची वेळ होती. सूर्य अस्ताला जाणाच्या मार्गावर होता.दूरवरून चालतानाच धबधब्याच्या पाण्याचा आवाज येत होता. त्या खळखळात करणाऱ्या लाटांचा आवाज ऐकून धबधबा बघण्याची उत्सुकता शिगेला  पोचत होति. भेटायला येण्याराना त्याच्या अस्तित्व ची दुरूनच पुसट शी कल्पना येत होति.  जवळ गेलो तर तो  वाहत होता कुठलीही तमा न बाळगता अगदी त्याच्या गतिने. अंदाजे ५२ मीटर (१७० फुट ) इतक्या उंचीवरून कोसळणारा तो जलप्रपात एका नजरेत मावत नवता. फेसाळणारे पाणी स्वच्छ दुधासारखे दिसत होते. गोलाकार निर्माण झालेले इंद्रधनुष्य त्याची शोभा अजूनच वाढवत होते. इंद्रधनुष्याचे रंग पाण्यात मिसळले होते तरीही स्वताचे असे वेगळे अस्तित्व दाखवत होते.सभोवतालचे झगमगाट करणारे दिवे त्याच्या सौंदर्यात भर टाकत होते.पक्षी आनंदाने पाण्यात विहार करत होते.  नजर जाईल तिकडे पाणीच पाणी दिसत होते. बोटी मध्ये असून सुधा त्याचा वाहण्याच्या गतीचे अस्तित्व जाणवत होते. सोसाट्याचा वारा आणि दूरवर उडणारे पावसाचे तुषार याने सर्व माणसे क्षणात चिंब भिजून जात होती अगदी रेन कोट असतानाही. निसर्ग च्या जवळ गेल्यावळ त्याला मुक्त पणे उपभोगावे असेच कदाचित त्याला सुचवायचे असेल.इतके सुंदर दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटत होते. काही जण तिथल्या प्रत्येक क्षणाला कॅमेरा मध्ये कैद करायचा प्रयत्न करत होते. तर काही जण डोळ्यात साठवून घेत होते. तिथला प्रत्येक क्षण याची देही याची डोळा अनुभवत होते. मनाच्या कप्प्यात साठवलेला प्रत्येक क्षण कधीही उघडून पाहता येतो. फोटो जास्त झाले म्हणून मनातले फोटो कधी डिलीट करावे लागत नाहीत किंवा उघडून पहायचे झाल्यास स्थळ काळ आणि वेळेचे बंधन राहत नाही. 

मी हि हे सुंदर दृश्य अगदी मन लावून बघत होते. इतक्या उंचावरून कोसळणाऱ्या त्या जलप्रपात ला डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होते. तो मात्र वाहत होता त्याच्या गतीने त्याच्या मार्गाने त्याच्या मर्जीने. सगळी बंधने झुगारून लावावीत आणि मुक्त आयुष्य जगावे न अगदी तसा. आपल्या मुळे सभोवताली सुजलाम सुफलाम भूमी झाली आहे याचा त्याला आनंद नवता आणि आपल्यामुळे काही जणांचे आयुष्य संपुष्टात आले आहे या बद्दल खेद नवता. सदैव वाहत राहणे हा त्याचा धर्म असल्याप्रमाणे तो ते प्रामाणिक पणे करत होता. निर्विकार कसे राहावे याचा अनुभव सांगणारा तो माझा एक गुरु होता. जास्त मिळाले म्हणून अति आनंदी होऊ नये आणि कमी झाले म्हणून दुख करू नये हे तो अबोलपणे सांगत होता. तिथले ते अप्रतिम सौंदर्य पाहून मला  शिवथर घळीवरील समर्थ रामदासांच्या ओळी आठवल्या
गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनि चालली बळे |
धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे || ||
गर्जता मेघ तो सिंधू | ध्वनी कल्होळ उठिला |
कड्याशी आदळे धारा | वाट आवर्त होतसे ||||

रात्र होत आली म्हणून आम्ही परत निघालो  तरी हि कानात अजून तोच आवाज घुमत होता. निसर्गाशी मी एकरूप झाले होते.

3 comments:

Vivekanand said...

great !

I am happy for you

Amit Dhaygude said...

Nice :)

Amit Dhaygude said...

Tuzya blog ani photos madhun mi hi te anubhavt ahe asa vatla ;)