Jul 13, 2014

ध्यासपर्व

ध्यासपर्व हा चित्रपट पाहायची माझी ही बहुदा तिसरी खेप असेल. तिन्ही वेळा विचार करायाला लावणारा हा फार थोडक्या चित्रपटांपैकी असेल. आता मी इथे चित्रपटाच्या निर्मिती मूल्या किंवा सिनेमा च्या सदरीकराण्या बद्दल लिहिणार नाहीये. कारण "अमोल पालेकरानी" तांत्रिक सफाई केलेली आहेच व अश्या चित्रपटात तांत्रिक गोष्टी फार महत्वाच्या आहेत असे मला स्वताला वाटत नाही. म्हणजे आता फक्त विचार मांडण्यासाठी कुणी एखादी "Power Point Movie" बनवेल आणि ती चित्रपट म्हणून विकेल, तर ते लोकांना आवडणार नाही. नक्कीच. पण विचार महत्वाचा.

ध्यासपर्व का आवडला? 

१) एकाद्या क्षेत्रात उतरून, निर्भीड पणे आपली मते मांडणे ही एक गोष्ट आणि ती मते कृतीत उतरवणे ही दुसरी अतिशय अवघड अशी गोष्ट. रघुनाथ रावांनी ह्या दोन्ही गोष्टी केल्या. ते आपल्या मतांवरती ठाम राहिले. आपली मते मांडताना त्यांनी ना लोकांची परवा केली ना सरकारची. काळाच्या पुढे ५०-६० वर्षे असलेले विचार मांडणे ही काही चेस्तेची गोष्ट नव्हे. ती त्यांनी करून दाखवली.

२) धोंडो केशव ह्या सारख्या उत्तुंग माणसाच्या पोटी जन्मून, आपली ओळख निर्माण केली. आपल्याला आवड्ण्यार्या गोष्टी केल्या. गणितासारख्या सुंदर गोष्टीचा अभ्यास केला. परदेश गमन करून, "संतती नियमनाच्या" नवीन गोष्टी भारतात आणल्या.

३) पत्नीशी संवाद. गांधीजी सारखेच कर्व्यांचे पण आपल्या पत्नीशी सुसंवाद होता. त्या मुले त्यांना बाके प्रसंग थोडे कमी बाके वाटले असतील.

काय आवडले नाही? 

१) थोडेसे लोकांना सोबत घेवून चालले असते तर? कार्य पुढे गेले असते. ह्या बाबतीत आपण "नरेंद्र दाभोलकरांना" केंद्रस्तानी ठेवू शकतो. त्यांनी चाकोरीतूनच चाकोरी बाहेरील काम करून ठेवले. शेवटी नेमाडे म्हणतात त्या प्रमाणे, खरी क्रांती ही आपल्या मातीतूनच रुजावी लागते. आपल्या हेकेखोर वृत्ती मुले बऱ्याच लोकांची त्यांच्या वाटचाली कडे दुर्लक्ष होते.

असे असले तरी कर्व्यांचे महत्व बिलकुल कमी होत नाही. He was a purist and purist have their distinct place in the society. They are society's light houses and Karve sure was one of them!

No comments: