Jan 6, 2014

सबकूच ठीक है?

आमच्या ऑफिस मध्ये एक म्हातारबाबा आहेत. वय साधारण ६०. गोरा पान, केस कमी जवळपास टक्कलच. स्तुल. म्हणजे साधारण पणे वय झालेला म्हातारा.

ह्यांना एक सवय आहे. वाईट सवय, खर तर. म्हातारबाबा येणाऱ्या, जाणाऱ्या  माणसाना त्यांच्या भाषेतील एक, दोन शब्द बोलून दाखवतात . म्हणजे भारतीय दिसला  कि, "नमस्ते, सबकूच ठीक है?", किंवा जेवण झाल असला तर, "स्वादीस्त  खाना खाया?" वा जेवायला जात असू तर, "स्वदिस्त खाना खायेंगे" असा चावट पणा . आता सुरवातीला ह्याच खूप कवतुक वाटल होत, पण नंतर हा बाबा फक्त असच हे सगळा विचारतो हे लक्षात आलं . पूर्वी पासून असलेले मित्र ह्यांच्या चाल्यान्या भावच द्याचे नहित. हा म्हातारा डोक्याने कमी आहे हे सहज लक्षात यायला लागलं .

आज घरी जाताना मी पण त्यांना एक नवीन वाक्य शिकवल, "नये साल कि हार्दिक शुभाकामानाये!". आणि त्यांनी ते पाठ पण करायला सुरवात केली . मी साधारण २० मीटर  दूर जाईपर्यंत इंग्रजी स्वरात, "नये साल कि हार्दिक शुभाकामानाये!" म्हणणे सुरु होते. म्हणजे आता ऑफिस  मधील लोकांना एक नवीन वाक्य एकायला मिळणार.

ह्या बाबा ला पहिला कि मला म्हतारपण किती कठीण असत हे समजत . मला माझ्या कॅमेरा मधून त्यांचा एक चांगला फोटो काधायचा आहे. आणि जमल तर त्यांना त्यांच्या कुटुंबा बद्दल विचारायच आहे. तूर्तास हे सगळ कठीण वाटत  आहे कारण बाबा सरळ शुद्ध हिंदीती वार्तालाप करू पाहतात, आणि मी जर त्यांना, "क्या मै  आपकी एक फोटो ले सकता हू?" अस विचारल तर थोडाच कळणार आहे?

पण पहिल्यांदा पार साता समुद्रापार एक गोरा, " सबकूच ठीक है?" अस विचारतो ह्याच अपरूप वाटलं  हे मात्र खर. बाबा आता थंडीचे घरच्यांना असेच प्रश्न विचारून भंडावत असतील काय?

No comments: