भक्ताने दिलेले तेल आता थेट शनिमूर्तीवर जाण्याची सोय आणि त्या बद्दलचे कवतुक लोकसत्ता मध्ये वाचता येईल.
मला तर हा प्रकार एकदम अचाट आणि अद्भूभूत वाटला. आणि ह्याची एवढी प्रसिद्धी करून आपण काय सांगू पाहतो? एक तर शनी मंदिरात बायकांना मुळीच प्रवेश नाही. बरे तिकडे सकाळी सकाळी पाहटे गार पाण्याची अंघोळ करून, फक्त मुकटा लावून देवाला तेल वहायला जाव लागत. सगळा प्रकार त्रासदायक असतो. आपण सुधरत नाही हेच ही बातमी सांगते.
जाता जाता, माझ्या एका मित्राची गोष्ट आठवली. मित्र आणि त्याच्या भावाला त्यांच्या आईने ५० रुपये प्रत्येकी दिले होते आणि भटजींना द्यायला सागितले होते. मित्र गुपचूप ५० रुपये देवून, नमस्कार करून आला. आता छोटा भाऊ म्हणाला कि, मी भक्त तर आहेच. म्हणून हळूच ५० रुपये स्वत: जवळ ठेवून, मस्त लोटांगण घालून आला. आता ह्याला मी चतुराई व बदल करण्याची योग्य पद्धती म्हणेन!

0 comments:
Post a Comment