Saturday, January 21, 2012

मावू आणि तिची पिल्लं


आजकाल घरी बोलताना फक्त मनी मावूची कवतुक ऐकायला मिळतात.

ही आमच्या घरी दोन एक महिन्या पूर्वी आली. तशी मोठी होती, वर्षा दीड वर्षा ची असेल.  सुरवातीला दिवसातून एक दोनदा येणे, कधी दिवसा आड येणे असे प्रकार करून झाल्या  नंतर ती अगदी नियमित यायला लागली. मग तिला भात, तूप, रोटी, चिवडा देणे हे ही सुरु झाले. आता एवढी मस्त गुबगुबीत, गोरी पण आणि मोठी मांजर आली म्हणून घरचे पण खूष. कारण छोट्या पिल्लं पासून मांजर तयार करणे जरा कठीन काम असता. विशेस करून जर तिची आई बरोबर नसेल तेव्हा. अगदी म्हणजे कापसाच्या बोल्यातून दूध वैगरे पाजणे, रात्री जागरणे करणे वैगरे.

आणि ह्या मनीने काही दिवसांपूर्वी तर चमत्कारच केला. आता हे होणार हे जरा वाटत होताच. कारण तिच पोट मोठ आणि चाल मंद झली होती. आणि ती सर्वांशी एकदम जवळ येत होती. बहुदा चाचपणी करत असावी. आणि तिचा विश्वास बसला एकदाचा. आणि एक दिवस आमच्या घरी तीन पिले घेवून आली.

आता ह्या पिलांसाठी तिने बिछाना पण तयार केला. अगदी वरच्या मजल्यावरून गोंन, जुने कपडे वैगरे आपल्या तोंडातून आणले. मस्त गरम आणि उबदार बिछाना तयार केला. आणि आता तर म्हने तिच्या बाळंततीनीच्या जागेत कुणालाच येवू नाही देत. फक्त आईला येवू देते.

मुक्या प्राण्याची माया आणि ती व्यक्त कारायच्या पद्धती किती सहज आणि सोप्या असतात नाही?

आणि ह्या वर्षी गोव्यात थंडी जरा जास्त असल्यामुळे, तिने घरातील सर्वात उबदार जागा शोधली आहे हे सांगणे न लागे!

मेओव मेओव मेओव.



2 comments:

Reshmi Mitra said...

too cute :) plz post more pics!

Reshmi Mitra said...

Very cute! plz post more photos. :)