Jul 16, 2011

गुरुपूर्णिमा - दादा, मनोहर पर्रीकर

My grandfather, Dada taught Goa's current leader of opposition and ex chief minister Manohar Parrikar. Manohar bhai remembers it still. I was so happy to read him an article on his गुरुज. He mentioned Dada in the article.

Dada it was great to see this article on your birthday. 15 July. I am still amazed that you read the newspaper, do daily chores, buy vegetables and walk for around 2 kilometers a day. Miss you here.


The article is as follows : 


गुरूंनी मला घडविले
माणसाच्या जीवनात एकच गुरू असतो, असे नाही. वयाच्या विविध टप्प्यांवर वेगवेगळी माणसे भेटत जातात. काही माणसांचे आपण शिष्यत्व पत्करतो. मी म्हापसा येथे शिकत असताना माङयावर प्रथम ठाकुर गुरुजींचा प्रभाव पडला. ते गणित विषय शिकवत. त्यांच्यामुळे मला गणिताबाबत मोठी आवड निर्माण झाली. पुढे आयआयटीर्पयत शिक्षण घेताना मला याचा लाभ झाला. मराठे नावाचेही एक शिक्षक होते. त्यांचाही माङयावर प्रभाव आहे.
मी राजकारणात आल्यानंतर माङयातील भडकपणा, तापटपणा थोडा तरी कमी झाला. अगोदर मला साध्या साध्या गोष्टींचा खूप राग यायचा. माङया आई-वडिलांनाही मी गुरू मानले. त्यांच्याकडून तर खूपच गोष्टी शिकलो. आई मला मराठीतील एक म्हण ऐकवायची, 'राग मारी स्वत:ला, संतोष मारी दुस:याला', अशी ती म्हण आईमुळे माङया लक्षात राहिली. माङया स्वभावात संघ प्रचारक नाडकर्णी यांच्याप्रमाणेच माङया आईमुळेही चांगला फरक पडला.
तरुणपणी पवई, मुंबई येथे मी आयआयटी संस्थेत शिक्षण घेण्यासाठी गेलो. तिथे एक-दोन शिक्षक माङया आवडीचे होते; पण तिथे मी स्वावलंबन शिकलो. आम्हाला आयआयटीत स्वत:ची सर्व कामे स्वत:च करावी लागत असत. हॉस्टेलमध्ये राहात असल्याने मदतीसाठी घरातील कुणी नव्हते, याचा मला मी मुख्यमंत्री झालो त्या वेळीही फायदा झाला. आताही लाभ होतोय. माझी बॅग मी स्वत: उचलून किंवा हातात घेऊन चालण्यास मला कधीच कमीपणा वाटत नाही; कारण गुरुजनांनी मला तसे शिकवले आणि आयआयटी शिकताना तर स्वत:ची कामे स्वत: करणे मला भागच पडले.
नाडकर्णी आता खूप वयस्क झाले आहेत. माङो गुरू म्हणून मला त्यांचा खूप अभिमान आहे. मी मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या संपर्कात असायचो. मी गुरूंना विसरलो नाही. मी सारस्वत कुटुंबातील. गोव्यात जुन्या काळात सारस्वतांच्या घरात समाजाने कमी ठरविलेल्या अन्य जातीतील लोक मोकळेपणाने वागू शकत नव्हते. मात्र, आमच्या घरी कुणीही अगदी स्वयंपाकघरात पोहोचत. आमच्यासोबत जेवत, याचे कारण म्हणजे माझी आई. आईला गुरू मानून मी हा गुण शिकलो. माझी आई मडकईची. तिथे त्यांची भाटे वगैरे होती. वडिलांच्या बाजूने काहीच नव्हते. आईच्या बाजूने बागायती वगैरे होत्या. त्यामुळे आईला स्वत:च्या बागायतीत काम करण्याची, प्रसंगी झाडावर चढण्याची सवय होती. तिच्यासोबत त्या वेळी भाटात, बागायतीत ज्या महिला काम करत, त्यापैकी काहीजणी आमच्या घरी यायच्या. त्या अगदी आमच्यातीलच झाल्या होत्या. हे आईमुळे शक्य झाले. मी आईला गुरू मानून हा गुण उचलला.
वडिलांकडूनही खूप काही शिकलो. म्हापसा येथील आमच्या दुकानावर मी वडिलांसोबत लहानपणी काम करत असे. त्याकाळी मुलांसाठी दुधाचे डबे खरेदी करण्याचे मोठे फॅड लोकांमध्ये होते. मुलांना घरी आईचे दूध न देता डब्याचेच दूध दिले जायचे. दूध टंचाई निर्माण झाल्यामुळे अनेक व्यापा:यांनी दुधाच्या डब्याचा दर वाढविला होता. तेरा रुपयांचा डबा थोडे पैसे वाढवून विकला जात होता. दूध मिळत नसल्याने लोक जास्त पैसे खर्च करून डबा विकत घेत होते. मीदेखील दुधाचा डबा विकताना तीन पैसे जास्त घेतले. त्या वेळी तीन पैशांचे पितळ व तांबेमिश्रित असे नाणे येत होते. मला वडिलांनी ते तीन पैसे ग्राहकाला परत करायला भाग पाडले. निदान मुलांच्या दुधाबाबत तरी अकारण जास्त पैसे आकारायचे नसतात, असे वडिलांनी मला बजावले. मी वडिलांना गुरू मानून हा गुण त्यांच्याकडून घेतला. माङया वडिलांनी अन्य वस्तूंवर मोठा नफा कमावला नाही, असे मी मुळीच म्हणणार नाही. मात्र, टंचाई निर्माण झालेली आहे, याचा लाभ घेऊन मुलांच्या दुधाच्या डब्यावर तरी जास्त पैसे आकारायचे नाहीत, अशी अट मला घालून देताना वडिलांनी मला एक प्रकारे मोठा संदेशच दिला. आपले व्यवहार व्यवस्थित आणि स्वच्छ असायला हवेत, हा गुण मी अशा प्रकारे वडिलांकडून घेतला.
गुरू स्वत:च्या आचरणातून दुस:याला शिकवत असतात. विविध टप्प्यांवर भेटलेल्या या गुरूंकडून मी अशा प्रकारे शिकत गेलो. कधी संघ प्रचारक, कधी स्वत:चे आई-वडील तर कधी रामायण, महाभारतातील पात्रे मी गुरुस्थानी मानली. मी पुस्तके वाचायला लागलो आणि मला छत्रपती शिवाजी, श्री राम, श्री कृष्ण यांचा परिचय झाला. मर्यादा पुरुषोत्तम राम, तसेच श्रीकृष्ण यांना मी आदर्श मानले. त्यांनाही गुरू मानून काही गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. राजाने प्रशासन
कसे चालवायचे असते, राजा म्हणून त्याची प्रजेप्रती कोणती कर्तव्ये असतात, या गोष्टी मी शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून शिकलो. या सगळ्य़ा गुरूंनी मला घडविले असेच मी
म्हणेन. काही गुरू प्रत्यक्ष, तर काही
गुरू पुस्तकांच्या माध्यमातून भेटले एवढेच.